Steven Smith : …तर पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्हन स्मिथ करणार ऑस्ट्रेलियाच नेतृत्त्व, नेमकं कारण काय? जाणून घ्या

…तर स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्त्व –
मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सध्या दुखापतीमुळे त्रस्त असून, पुनर्वसन प्रक्रियेत आहे. त्यामुळे तो अॅशेस मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. कमिन्स अनुपलब्ध राहिल्यास अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले.
जॉर्ज बेली म्हणाले काय म्हणाले?
पॅट कमिन्स सध्या कमरेच्या दुखापतीतून सावरत असून, त्याला भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. २१ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीही त्याचा सहभाग अनिश्चित आहे. यासंदर्भात बोलताना जॉर्ज बेली म्हणाले, “पॅट कमिन्स हा आमचा नियमित कर्णधार आहे. पण जर तो अॅशेस मालिकेत खेळू शकला नाही, तर स्टीव्हन स्मिथ संघाचे नेतृत्व करेल. भूतकाळात ही रणनीती यशस्वी ठरली आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की स्मिथ ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल.”
हेही वाचा – Babar Azam : बाबर आझमचे टी-20 आंतरराष्ट्रीय संघात लवकरच पुनरागमन; खरं की अफवा? जाणून घ्या
स्मिथ नुकताच न्यूयॉर्कहून ऑस्ट्रेलियात परतला –
मधल्या फळीतील आधारस्तंभ असलेला स्टीव्हन स्मिथ नुकताच न्यूयॉर्कहून ऑस्ट्रेलियात परतला असून, त्याने क्रिकेट न्यू साऊथ वेल्सच्या मुख्यालयात सरावाला सुरुवात केली आहे. तो आगामी शेफील्ड शिल्ड स्पर्धेत ब्रिस्बेन आणि सिडनी येथील दोन सामन्यांमध्ये न्यू साऊथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे, ज्यामुळे त्याला अॅशेस मालिकेसाठी चांगली तयारी करता येईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरून सुरू होईल, तर अॅशेस मालिकेचा पहिला सामना याच मैदानावर रंगणार आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आणि नेतृत्वावर परिणाम होऊ शकतो, परंतु स्मिथच्या अनुभवामुळे संघाला स्थिरता मिळण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे..





