WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास; अजिंक्य रहाणेला मागे टाकत बनला नंबर वन!

Steve Smith record in WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अडचणीत होता, तेव्हा स्टीव्ह स्मिथने जबाबदारी घेतली आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यादरम्यान स्टीव्ह स्मिथने एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. त्याने जुना विक्रम मोडला आणि त्यावर आपले नाव कोरले.
स्मिथने डब्ल्यूटीसीच्या फायनल सामन्यात रचला इतिहास –
आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन अंतिम सामने झाले आहेत. या सामन्यापूर्वी, त्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारताचा अजिंक्य रहाणे होता. त्याने दोन सामन्यांच्या चार डावात १९९ धावा केल्या. पण आता स्टीव्ह स्मिथने त्याला मागे टाकले आहे. लॉर्ड्सवर स्टीव्ह स्मिथने ४५ धावा पूर्ण करताच तो रहाणेच्या पुढे गेला. इतकेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाजही बनला आहे.
ट्रॅव्हिस हेडही लवकरच पूर्ण करू शकतो २०० धावा –
Steve Smith brings out his best in pressure situations during knockout games! 🇦🇺🤝
The Aussie star batter delivers yet another fifty in the WTC Final against the Proteas! 🔥#SteveSmith #WTCFinal #AUSvSA #Sportskeeda pic.twitter.com/tLUBviWU42
— Sportskeeda (@Sportskeeda) June 11, 2025
सध्या स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, पण अजिंक्य रहाणे अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडही मागे नाही. त्याने आतापर्यंत दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळले आहेत आणि तीन डावांमध्ये १९२ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड रहाणेचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा होती, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात तो फक्त ११ धावा काढून बाद झाला. परंतु स्टीव्ह स्मिथने ही संधी सोडली नाही आणि नंबर वन स्थान पटकावण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा – WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथने ९९ वर्षांचा विक्रम मोडत लॉर्ड्सवर रचला इतिहास, ब्रॅडमन-सोबर्सला टाकलं माग
स्मिथने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झळकावलीतं सर्वाधिक अर्धशतकं –
दरम्यान, स्टीव्ह स्मिथ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत त्याने दोन सामन्यांमध्ये तीन डाव खेळून दोन अर्धशतके झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. इतर अनेक फलंदाजांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे. यामध्ये अॅलेक्स कॅरी, ड्वेन कॉनवे, ट्रॅव्हिस हेड, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे, परंतु स्मिथने दोन अर्धशतके झळकावली आहेत.





