Steve Smith Century : ६,६,६,६…एकाच षटकात ३२ धावा कुटत स्मिथने ठोकली वादळी ‘सेंच्युरी’! वॉर्नरच्या शतकावर पाणी

Steve Smith Century against Sydney Thunder : बिग बॅश लीगमध्ये (BBL) शुक्रवारी सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेला सामना ऐतिहासिक ठरला. डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीला स्टीव्ह स्मिथने चोख प्रत्युत्तर दिले. स्मिथच्या तुफानी शतकाच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने हा सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात स्मिथने एकाच षटकात ४ सलग षटकार मारत सिडनी क्रिकेट ग्राउंडवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.
बाबरला नाकारली सिंगल अन् पुढच्याच ओव्हरमध्ये राडा –
या सामन्यातील ११ व्या षटकात एक रंजक घटना घडली. ख्रिस ग्रीनच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर बाबर आझमने लॉग ऑनच्या दिशेने फटका मारला. बाबरला एक धाव (सिंगल) हवी होती, मात्र नॉन-स्ट्रायकिंग एंडला उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने धाव घेण्यास नकार दिला. स्मिथला पुढच्या षटकात स्वतः स्ट्राईक हवी होती आणि त्याचा हा निर्णय सार्थ ठरला.
“Wasn’t happy, Babar.” 😳
Drama in the middle of the SCG after Steve Smith knocked back a run from Babar Azam, so he could take strike during the Power Surge. #BBL15 pic.twitter.com/rTh0RXE0A5
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2026
एका ओव्हरमध्ये ४ षटकार आणि ३२ धावा!
32 RUNS OFF ONE OVER!
Steve Smith hit four sixes in a row in this wild over at the SCG. #BBL15 pic.twitter.com/fSPEaw3Xoo
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2026
१२ व्या षटकात स्ट्राईक मिळताच स्मिथने रौद्र रूप धारण केले. त्याने गोलंदाजाची पिसे काढत पहिल्या ४ चेंडूंवर सलग ४ उत्तुंग षटकार ठोकले. यानंतर पाचवा चेंडू ‘नो बॉल’ पडला, ज्यावर त्याने चौकार मारला. त्यानंतर एक वाईड चेंडू पडला आणि शेवटच्या कायदेशीर चेंडूवर २ धावा घेतल्या. अशा प्रकारे स्मिथने एकाच षटकात तब्बल ३२ धावा कुटल्या आणि सामन्याचे पारडे सिक्सर्सच्या बाजूने झुकवले.
स्मिथचे वेगवान शतक; वॉर्नरचे प्रयत्न व्यर्थ –
स्टीव्ह स्मिथने केवळ ४२ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ९ गगनभेदी षटकार लगावले. दुसऱ्या बाजूने बाबर आझमने ३९ चेंडूत ४७ धावांची संयमी साथ दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे सिडनी सिक्सर्सने १८९ धावांचे मोठे लक्ष्य सहज गाठले.
तत्पूर्वी, सिडनी थंडर्ससाठी डेव्हिड वॉर्नरने ११० धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र, वॉर्नरच्या या शतकापेक्षा स्मिथचे शतक सरस ठरले आणि सिडनी थंडर्सच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडाली.





