Prajakta Mali: चिखलात उतरून भातलावणी करत….प्राजक्ता माळीने साधेपणाने साजरा केला वाढदिवस
Prajakta Mali: भातलावणीच्या कामात प्राजक्ता माळीने स्वतः घेतला सहभाग

Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, चित्रपट निर्मिती आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. मात्र, प्राजक्ताने यंदाचा हा खास दिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.
आपल्या आयुष्यातील या नव्या वर्षाची सुरुवात प्राजक्ताने आध्यात्मिक वातावरणात केली. पुण्यात असताना तिने सारसबागेतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. यानंतर ती तळजाई मातेच्या दरबारी नतमस्तक झाली. Prajakta Mali
View this post on Instagram
शेतकरी महिलांसोबत भाताची रोपे लावली
यंदाच्या वाढदिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्राजक्ताने शहराची धावपळ बाजूला सारत थेट शेताची वाट धरली. पावसाळ्याच्या दिवसांत शेतात सुरू असलेल्या भातलावणीच्या कामात तिने स्वतः सहभाग घेतला. शेतकरी महिलांसोबत तिने स्वतःच्या हाताने भाताची रोपे लावली.
मातीचा सुगंध, पाऊस आणि शेतीतील कष्टाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. प्राजक्ताच्या या साधेपणाचे भरभरून कौतुक केले. चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तिच्या या अनोख्या सेलिब्रेशनला पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, प्राजक्ताच्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमधून झाली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे. २०११ मध्ये ‘सुवासिनी’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर २०१३ मध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील ‘मेघना देसाई’ या भूमिकेने तिला घराघरांत पोहोचवले. Prajakta Mali
अभिनेत्री म्हणून यश मिळवल्यानंतर प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले. तिची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असलेला ‘फुलवंती’ हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला.
हेही वाचा:





