ऑफिसच्या वातावरणात स्ट्रेसचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या कामावरही जाणवू शकतो. त्यामुळे स्ट्रेस फ्री राहून काम करणे केव्हाही उत्तम. कामादरम्यान 10 मिनिटांचा वेळ काढून आपल्या आयुष्यातील आवडते क्षण, सुट्टीतील मजा आठवावीत.
हे क्षण आपल्याला आनंदी करतील आणि काही वेळासाठी आपण स्ट्रेस फ्री व्हाल. अरोमा थेरेपी स्ट्रेस लेव्हलला कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आपल्या डेस्क जवळ काही एसेंशिअल ऑइल ठेवा, ज्याच्या हलक्या सुगंधाने आपला ताण कमी होण्यास मदत होईल. एसेंशिअल ऑइलमुळे त्वचेला गारवा मिळेल आणि त्वचा ताजीतवानी होईल.
आपल्या ऑफिसमध्ये जे काम आहे, त्याची आपल्या हस्ताक्षरात लिस्ट बनवावी आणि अशा ठिकाणी ठेवावी जिथून ती आपल्याला लगेच मिळेल. त्यामुळे ऐनवेळेला धांदल उडत नाही. ज्यामुळे आपण स्ट्रेस फ्री राहू शकाल. 2002मध्ये एका अभ्यासानुसार व्हिटॅमिन सी आपल्याला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी खूप मदत करतो, असे समोर आले आहे.