पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत. तसेच अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.