पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील महिन्यात १५ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी दिली आहे. ही स्पर्धा हांडेवाडीतील एसपीएम शाळेजवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानावर होणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पाटकवणाऱ्या कुस्तीपटूला रोख ५ लाख रुपये व चांदीची दगाही देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक विजेत्याला ३ लाख व सन्मान चिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या खेळाडूला २ लाख व सन्मान चिन्ह तसेच चौथ्या क्रमांकावरील कुस्तीपटूला १ लाख व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
दरम्यान, भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने व परिषदेच्या नियमानुसार होणार असून, या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे. चार दिवसीय असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.