SBI: स्टेट बँक देशभरात नव्या 500 शाखा उघडणार

मुंबई – एटीएम आणि डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे बँकांच्या शाखांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात असतानाच भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक चालू आर्थिक वर्षात नव्या 500 शाखा उघडणार आहे. यामुळे स्टेट बँकेच्या एकूण शाखांची संख्या 23,000 होणार आहे.
तीन बँकांचे बिलनीकरण स्टेट बँकेत झाल्यामुळे स्टेट बँकेचा ताळेबंद वाढला आहे. त्यामुळे स्टेट बँक देशातील आणि परदेशातील भारतीय उद्योगांना अधिक सहजतेने मदत करू शकणार आहे. 1921 मध्ये स्टेट बँकेच्या भारतातील एकूण शाखांची संख्या केवळ 250 होती. ती आता 22,500 इतकी झाली आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये आणखी पाचशे शाखा उघडल्यानंतर या शाखांची संख्या 23 हजारावर जाणार आहे.
भारतातील बँका मोठ्या व्हाव्यात असे सरकारचे धोरण आहे. देशातील एकूण बँकांच्या ठेवीत स्टेट बँकेतचा वाटा 22.4% आहे. स्टेट बँकेकडे 50 कोटी ग्राहक आहेत. या बाबी अभिमानास्पद आहेत असे स्टेट बँकेने म्हटले आहे. बँकेने डिजिटल तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ही बँक प्रत्येक दिवसाला वीस कोटी यूपीआय व्यवहार हाताळू शकते.





