स्टेट बँकेची 20,000 कोटींच्या भांडवल उभारणीची घोषणा; रोखे विक्रीद्वारे निधी मिळवणार
Updated On:

मुंबई – भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया रोखे विक्रीच्या माध्यमातून देशातून 20,000 कोटी रुपयांची भांडवल उभारणी करणार आहे. देशातील गुंतवणूकदारांकडून ही भांडवल उभारणी चालू आर्थिक वर्षात केली जाणार असल्याचे स्टेट बँकेने शेअर बाजारांना कळविलेल्या माहितीत म्हटले आहे.
स्टेट बँकेच्या या प्रस्तावाला स्टेट बँकेच्या संचालक मंडळांनी परवानगी दिली आहे आणि हा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठविला जाणार आहे. भारत सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर हे रोखे देशांतर्गत बाजारात जारी करून 20,000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. स्टेट बँकेने शेअर बाजारांना ही माहिती दिल्यानंतर या बँकेच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यापर्यंत वाढ झाली होती.





