Archery World Cup : भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शांघायमध्ये फडकवला तिरंगा! चीनला धूळ चारत जिंकलं ऐतिहासिक सुवर्णपदक
Archery World Cup : भारतासाठी हा विजय अत्यंत खास मानला जात आहे, कारण याच चिनी संघाने १० ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या बलाढ्य दक्षिण कोरियाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला होता.

Archery World Cup India Women Recurve Team Won Gold Medal : शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अनुभवी दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि युवा कुमकुम मोहोड या त्रिकुटाने यजमान चीनचा त्यांच्याच भूमीत थरारक शूट-ऑफमध्ये ५-४ असा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
अटीतटीचा थरार आणि शूट-ऑफचा विजय –
अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारताने पहिला सेट ५४-५३ असा जिंकून दमदार सुरुवात केली होती, ज्यात दीपिका कुमारीने सलग १० गुणांचा नेम साधला. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये चीनने जोरदार पुनरागमन करत भारतावर दबाव निर्माण केला. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत सुटल्याने निकाल टायब्रेकरमध्ये (शूट-ऑफ) गेला. शूट-ऑफमध्ये अंकिताने ९, कुमकुमने १० आणि दीपिकाने ९ गुण मिळवत भारताला २८-२६ असा विजय मिळवून दिला.
Beating hosts China, in Shanghai, in the final….
That’s what’s called a Bull’s-Eye…
🇮🇳🇮🇳🇮🇳👏🏽👏🏽👏🏽 pic.twitter.com/irMfJl8XaO pic.twitter.com/GJTHdbARpQ
— anand mahindra (@anandmahindra) May 10, 2026
दक्षिण कोरियाला हरवणाऱ्या चीनला नमवले –
#Watch: India defeats hosts China in a dramatic shoot-off to win women’s recurve team gold at the Archery World Cup in Shanghai.
India had earlier beaten South Korea in the semifinals.#JaagIndia #India #Archery #Shanghai #Breaking pic.twitter.com/23GJo6xmgG
— Jaag India (@thejaagindia) May 10, 2026
भारतासाठी हा विजय अत्यंत खास मानला जात आहे, कारण याच चिनी संघाने १० ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या बलाढ्य दक्षिण कोरियाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. अशा बलाढ्य संघाला हरवून भारताने २०२१ नंतर महिला रिकर्व्ह प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावले आहे.
दीपिका कुमारीचे सातवे सुवर्णपदक –
🏹🇮🇳 Golden comeback by India’s women’s recurve team!
Deepika Kumari, Kumkum Mohod & Ankita Bhakat stun China in a thrilling shoot-off to win 🥇 at the Archery World Cup in Shanghai 🔥A historic 12th World Cup gold for Deepika 💫 — now tied with Jyothi Surekha Vennam for… pic.twitter.com/YwOJlvGaA4
— Doordarshan Sports (@ddsportschannel) May 10, 2026
भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीने या विजयासह आपल्या कारकिर्दीतील सातवे विश्वचषक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयामुळे भारताची गेल्या तीन वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षाही संपली आहे. या स्पर्धेत तिरंदाज साहिल जाधवने यापूर्वीच कांस्यपदक जिंकले असून, सिमरजीत कौरकडूनही पदकाच्या आशा कायम आहेत.





