Paris Olympics 2024 (Archery) : दीपिकाचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश तर तरुणदीपचे आव्हान संपुष्टात…

Paris Olympics 2024 (Archery) : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये आज भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारीने नेदरलँडच्या क्विंटी रोफेनला 6-2 पराभूत करताना महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर दुसरीकडे पुरूषामध्ये भारतीय तिरंदाज तरुणदीप रायला पराभव पत्करावा लागला आहे.
भारतीय तिरंदाज तरुणदीप रायला पुरुषांच्या वैयक्तिक श्रेणीतील राऊंड ऑफ 64 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडच्या टॉम हॉलने विजय मिळवत पुढील फेरीत आगेकूच केली आहे. चौथे ऑलिम्पिक खेळत असलेल्या तरुणदीपला इंग्लंडच्या तिरंदाजाने 6-4 (27-27, 27-28, 28-25, 28-29, 29-29) ने पराभूत केले.
#Archery : Tarundeep Rai eliminated in the opening round.@mansukhmandviya, @IndiaSports, @MIB_India, @PIB_India, @DDNewslive, @DDIndialive, @AkashvaniAIR, @Media_SAI #Paris2024 #Cheer4Bharat #Olympics pic.twitter.com/UD8WOEtms8
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 31, 2024
तत्पूर्वी, दीपिकाने क्विंटीवर 29-28, 27-29, 25-17, 28-23 मात केली. पहिला सेटमध्ये दीपिकाने 29-28 अशी केवळ एका गुणाने क्विंटीवर मात केली. दुसरा सेटमध्ये क्विंटीने पुनरागमन करताना दीपिकाला 27-29असे पराभूत केले. तिसरा सेट दीपिकाने 25-17 असा तर चौथा सेट 28-23 असा जिंकताना लढतीत यश मिळविले.
Deepika Kumari beat Reena Parnat of Estonia by 6-5 and moves to the 1/16 elimination round.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Archery @mansukhmandviya @MIB_India @PIB_India@IndiaSports @Media_SAI @AkashvaniAIR @DDNational @DDIndialive @DDNewslive @ImDeepikaK pic.twitter.com/yyeRXJ30JS
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 31, 2024
दीपिकाने इन्स्टोनियाच्या रिना परनाटला 6-5 असे पराभूत करताना आगेकूच केली होती. दीपिकाची पुढची लढत 3 ऑगस्ट रोजी असणार आहे. भारताची दीपिका कुमारी अनुभवी तिरंदाज असून तिने या पूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2 रौप्य पादकांसह चार पदके मिळविली आहेत.





