Saliya Saman Ban : ICC ने श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूवर घातली ५ वर्षांची बंदी! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

काय आहे प्रकरण?
ही बंदी 13 सप्टेंबर 2023 पासून लागू मानली जाईल, ज्या तारखेपासून समनवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे त्याने यापैकी दोन वर्षांचा बंदीचा कालावधी पूर्ण केला आहे. 39 वर्षीय समन याने श्रीलंकेसाठी 101 प्रथम श्रेणी आणि 77 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्याच्यावरील आरोप 2021 मधील अबुधाबी टी10 लीगशी संबंधित आहेत.
Former Sri Lankan domestic cricketer #SaliyaSaman has been banned from all forms of Cricket for five years after an ICC Anti-Corruption Tribunal found him guilty of breaching the Emirates Cricket Board (ECB) Anti-Corruption Code. pic.twitter.com/3C4OSctYQE
— All India Radio News (@airnewsalerts) August 15, 2025
सप्टेंबर 2023 मध्ये समनसह आठ जणांवर 2021 अबुधाबी टी10 क्रिकेट लीगशी निगडीत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली होती. न्यायाधिकरणाने निश्चित केले की, समनने या स्पर्धेतील सामने हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आयसीसी आणि नियुक्त भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हे उल्लंघन रोखले गेले.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘क्या रिटायरमेंट ले लूं…?’, रोहित वनडे निवृत्तीबद्दल बोलतानाचा ऋषभ पंतने शेअर केला VIDEO
काय आहेत आरोप?
न्यायाधिकरणाने समनला 2021 अबुधाबी टी10 मधील सामने निश्चित करण्याचा प्रयत्न, कट रचणे किंवा अनुचित प्रभाव टाकण्याचा प्रयत्न (कलम 2.1.1), भ्रष्ट आचरणासाठी इतर सहभागींना बक्षीस देण्याची ऑफर (कलम 2.1.3), आणि इतर खेळाडूंना संहितेच्या कलम 2.1 चे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्यासाठी सुविधा पुरवणे (कलम 2.1.4) यासाठी दोषी ठरवले आहे.
हेही वाचा – IND vs AUS : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात फडकवला तिरंगा, वनडे मालिकेत घेतली अजिंक्य आघाडी
सालिया समनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 101 सामन्यांत 27.95 च्या सरासरीने 3,662 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोच्च स्कोर 129 धावा आहे.





