IND vs AUS : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात फडकवला तिरंगा, वनडे मालिकेत घेतली अजिंक्य आघाडी

IND A vs AUS A 2nd ODI Highlights : यास्तिका भाटिया, राधा यादव आणि तनुजा कंवर यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारत ‘अ’ महिला संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ ला धूळ चारली. भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारत ‘अ’ ने शेवटच्या चेंडूपूर्वी हा रोमांचक विजय मिळवला. यापूर्वी टी-20 मालिकेत भारत ‘ए’ ला 3-0 असा पराभव पत्करावा लागला होता.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 50 षटकांत 9 बाद 265 धावा उभारल्या. कर्णधार एलिसा हीलीने 87 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांसह 91 धावांची खणखणीत खेळी साकारली. तिने रचेल ट्रेनमेन (24) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर त्यांना फारसा आधार मिळाला नाही.
भारत ‘अ’ संघाची खराब सुरुवात –
Bawaaaaaaahaaa!! Series Win for India A against AUS !. They have chased down 266 runs
Yastika: 66 (71)
Radha Yadav: 60(78)
Tanuja kanwar: 50(57)
Prema rawat: 32(33)An Absolute team performance. MInd you AUS have Mcgrath, Healy, Kim garth and darcie brown in this team pic.twitter.com/fMc9ER0ZNx
— Bleed Blue (@CricCrazyVeena) August 15, 2025
प्रत्युत्तरात भारत ‘अ’ संघाची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा (4) आणि धारा गुज्जर (0) लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. यानंतर यास्तिका भाटियाने 71 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 66 धावांची संयमी खेळी करत डाव सावरला. ती 29व्या षटकात बाद झाली तेव्हा भारताची धावसंख्या 5 बाद 151 धावा होती. यास्तिका आणि राधा यादव (78 चेंडूंमध्ये 60 धावा) यांनी पाचव्या गड्यासाठी 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राधा 39व्या षटकात बाद झाली तेव्हा भारताची अवस्था 7 बाद 193 धावा होती.
आठव्या गड्यासाठी 68 धावांची निर्णायक भागीदारी –
यानंतर फिरकी अष्टपैलू तनुजा कंवरने 57 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी करत विजयाची आशा जिवंत ठेवली. तिने प्रेमा रावत (नाबाद 32) सोबत आठव्या गड्यासाठी 68 धावांची निर्णायक भागीदारी केली. तनुजा बाद झाल्यानंतर प्रेमा आणि टिटास साधू यांनी शेवटच्या षटकात 5 धावांची गरज असताना संयमाने खेळत विजय मिळवला.
यापूर्वी बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला 48 चेंडू राखून तीन गडी राखून पराभूत केले होते. राधा यादवने 45 धावांत 3 गडी टिपले, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ 47.5 षटकांत 214 धावांवर आटोपला. यास्तिका भाटियाच्या 70 चेंडूंमध्ये 59 धावांच्या खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने 42 षटकांत लक्ष्य गाठले. यासह भारत ‘अ’ संघाचा हा सलग दुसरा विजय मालिकेतील त्यांचा दबदबा दर्शवतो.





