Sri Lanka Squad : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर! ३ खेळाडू बाहेर; २ अनकॅप्ड खेळाडूंची एन्ट्री
Sri Lanka Squad Announce : प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

Sri Lanka Squad Announced For Colombo 2nd Test Against India : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आधीच कोलंबोमध्ये दाखल झाला असताना, श्रीलंका क्रिकेट मंडळाने दुसऱ्या कसोटीसाठी आपला सुधारित संघ जाहीर केला आहे. पहिल्या कसोटीत १६५ धावांनी झालेल्या पराभवानंतर आणि प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
दिनेश चंडीमल अधिकृतपणे बाहेर; दोन नव्या चेहऱ्यांना संधी!
गॉल कसोटीत डोक्याला चेंडू लागल्यामुळे (Concussion) बाहेर पडलेला अनुभवी फलंदाज दिनेश चंडीमल आयसीसीच्या नियमांनुसार दुसऱ्या कसोटीतूनही अधिकृतपणे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कामिल मिशारा (Kamil Mishara) आणि सहान अराचिगे (Sahan Arachchige) या दोघांना संघात संधी देण्यात आली आहे. या दोघांनी अद्याप कसोटी पदार्पण केलेले नसून, यांपैकी एकाला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
तीन खेळाडूंची गच्छंती; संघात मोठी खांदेपालट!
पहिल्या सामन्यातील सुमार कामगिरीनंतर निवड समितीने कडक पाऊल उचलत निशान मदुष्का, रमेश मेंडिस आणि दिलशान मदुशंका या तिघांना थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2025-27) स्पर्धेच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावरील भारताला रोखण्यासाठी आणि मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी सहाव्या क्रमांकावरील श्रीलंकेला विजयाची नितांत गरज आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही देशांचे अधिकृत संघ:
Sri Lanka Squad for 2nd Test Against India at SSC #sportspavilionlk #danushkaaravinda #SLvsIND #INDvsSL #fypシ゚viralシfypシ゚ pic.twitter.com/udIVfqtPv3
— DANUSHKA ARAVINDA (@DanuskaAravinda) August 21, 2026
श्रीलंका संघ: धनंजय डी सिल्व्हा (कर्णधार), कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदू सूर्याबंदारा, सहान अराचिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवंता, प्रभात जयसूर्या, मिलन रत्नायके, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो.
भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, औकिब नबी.





