Root WTC Record : जो रूटने रचला नवा इतिहास! डब्ल्यूटीसीत ‘हा’ खास पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच कर्णधार
Root WTC Record : बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर पुन्हा कसोटी संघाची धुरा हाती घेणाऱ्या रूटने ११२ चेंडूंत १० चौकारांसह विक्रमी कामगिरी नोंदवली.

Joe Root First Captain To Score 3000 Runs In WTC History in ENG vs PAK Test 2026 : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) इतिहास रचला आहे. पहिल्या डावात ६६ धावांची संयमी खेळी साकारत जो रूट जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या इतिहासात कर्णधार म्हणून ३००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर पुन्हा कसोटी संघाची धुरा हाती घेणाऱ्या रूटने ११२ चेंडूंत १० चौकारांसह ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
डब्ल्यूटीसीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा; जो रूट अव्वल स्थानी!
जो रूटने आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये कर्णधार म्हणून खेळलेल्या ३४ सामन्यांच्या ६३ डावांत ५०.४ च्या सरासरीने ३,०२४ धावा फटकावल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स २,१८२ धावांसह दुसऱ्या, तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने २,१६० धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट (१,९९४ धावा) चौथ्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम (१,९१८ धावा) पाचव्या स्थानावर आहे.
डब्ल्यूटीसीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
- जो रूट (इंग्लंड): ३,०२४ धावा
- बेन स्टोक्स (इंग्लंड): २,१८२ धावा
- दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका): २,१६० धावा
- क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडिज): १,९९४ धावा
- बाबर आझम (पाकिस्तान): १,९१८ धावा
विराट कोहली आणि रोहित शर्मा यादीत बरेच मागे!
🚨 MOST 50+ SCORES IN TEST HISTORY:
🥇 Sachin Tendulkar — 119
🥈 Joe Root — 109*
Joe Root continues to rewrite the record books and is closing in on one of cricket’s greatest milestones. The greatest England Test batter ever. 🔥🏏 pic.twitter.com/W201UK0Wva— Samjho India (@Samjhoindia143) August 21, 2026
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले भारताचे माजी कर्णधार या विक्रमी यादीत बरेच मागे राहिले आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली १,३४९ धावांसह सहाव्या, तर रोहित शर्मा १,२५४ धावांसह आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या दोघांच्याही पुढे पाचव्या स्थानी आहे. सध्या रोहित आणि विराट हे केवळ एकदिवसीय (ODI) आणि आयपीएल स्पर्धांमध्येच खेळताना दिसत आहेत.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडची ३६६ धावांपर्यंत मजल; १९५ धावांची भक्कम आघाडी!
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने ८ बाद ३६६ धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पाकिस्तानचा पहिला डाव १७१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडकडे आता १९५ धावांची भक्कम आघाडी झाली आहे. कर्णधार जो रूटच्या ६६ धावांशिवाय जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी फलंदाज हॅरी ब्रूक (९१ धावा) आणि जॉर्डन कॉक्स (७३ धावा) यांच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकांमुळे इंग्लंडने ही मोठी धावसंख्या उभारली.





