SRH vs RR Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने स्वतःच्याच सहकाऱ्याला मारला चेंडू, लाईव्ह सामन्यात टळली मोठी दुर्घटना

SRH vs RR Yashasvi Jaiswal Hit Sandeep Sharma Chest With Ball : आयपीएल २०२५ ची सुरुवात धमाकेदार झाली आहे. १८ व्या हंगामातील पहिल्या डबल हेडर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येत आहेत. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सनरायझर्ससाठी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी त्यांच्या परिचित शैलीत धमाकेदार सुरुवात केली. दरम्यान, डावाच्या ७ व्या षटकात, यशस्वी जैस्वालने एक चूक केली, ज्यामुळे संघाचे मोठे नुकसान होऊ शकले असते.
संदीप शर्मा थोडक्यात वाचला –
खरंतर, डावाच्या ७ व्या षटकातील ५व्या चेंडूवर, ट्रॅव्हिस हेडने लाँग ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. तिथे उभा असलेला क्षेत्ररक्षक यशस्वी जैस्वालने पटकन चेंडू पकडला आणि बॉलिंग एंडकडे फेकला. यावेळी संदीप शर्मा ट्रॅव्हिस हेडशी गप्पा मारण्यात व्यस्त होता. अशा परिस्थितीत त्याला चेंडू दिसला नाही आणि तो थेट त्याच्या छातीवर आदळला. चेंडू संदीपकडे खूप वेगाने आला. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे संदीपला गंभीर दुखापत झाली नाही आणि तो पुन्हा गोलंदाजी करताना दिसला.
YASHASVI HITS SANDEEP SHARMA!
Yashasvi Jaiswal threw a ball which hit the chest of Sandeep Sharma, the reaction of it says a lot. #IPL2025 #T20Cricket #SandeepSharma #TravisHead #Yashasvijaiswal #SRHvsRR #SRHvRR pic.twitter.com/emQ1RP61v1
— Priyanshu Kumar (@priyanshupov) March 23, 2025
हैदराबादच्या फलंदाजांनी केला कहर –
#YashasviJaiswal #RRvsSRH #SRHvRR #TravisHead #kavyamaran #jofrarcher #TATAIPL2025 #IPL2025 #yashavijaiswal #riyanparag #IshanKishan #NitishKumarReddy #maheshtheekshana #heinrichklaasen pic.twitter.com/hMUwBlRIEW
— 📍आपनो भारत (@AApnoIndia) March 23, 2025
सनरायझर्स हैदराबादसाठी पहिल्याच सामन्यात ट्रॅव्हिस हेडने कहर केला. तो ३१ चेंडूत ६७ धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला. या डावात त्याने ९ चौकार आणि ३ षटकारही मारले. सनरायझर्सकडून डावाची सुरुवात करताना त्याने अभिषेक शर्मासोबत ४५ धावांची भागीदारी केली.
अभिषेक शर्मा लवकर बाद झाला असला तरी, त्यानंतर सनरायझर्सकडून इशान किशनने शानदार खेळी केली. यादरम्यान, त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरला आहे.





