SRH vs RR : हैदराबादने राजस्थानच्या विजयरथाला लावला ब्रेक! विदर्भाचा प्रफुल्ल हिंगे ठरला विजयाचा शिल्पकार
SRH vs RR : आयपीएल २०२६ च्या हंगामात विजयाचा वारू चौखूर उधळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला अखेर ब्रेक लागला आहे.

SRH vs RR Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals : आयपीएल २०२६ च्या हंगामात विजयाचा वारू चौखूर उधळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला अखेर ब्रेक लागला आहे. सलग चार विजयानंतर राजस्थानला या मोसमातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादने युवा पदार्पणवीर प्रफुल्ल हिंगेच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानला १५९ धावांत रोखत ५७ धावांनी मोठा विजय मिळवला. तसेच या विजयासह राजस्थानचे वर्चस्व मोडीत काढले.
सनरायझर्स हैदराबादचं दमदार कमबॅक –
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात यजमान सनरायझर्सने प्रथम फलंदाजी केली, मात्र त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर स्टार सलामीवीर अभिषेक शर्माला जोफ्रा आर्चरने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडही मोठी खेळी करू शकला नाही. अशा कठीण प्रसंगात कर्णधार इशान किशनने मैदानाचा ताबा घेतला आणि राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला.
It’s all Orange in Hyderabad 🧡
A dominant victory by 5⃣7⃣ runs for @SunRisers ✌️
They end #RR‘s unbeaten streak this season 👏
Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRR pic.twitter.com/ZRdkxcW2jh
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
इशान किशनची स्फोटक फटकेबाजी –
A phenomenal knock comes to an end 👏
Ishan Kishan heads back after scoring 91 off 44 balls 👌
Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/vSW3p8m1pr
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
इशानने अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ९१ धावांची धडाकेबाज खेळी करत हैदराबादला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याने हेनरिक क्लासेनसोबत (४० धावा) तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेरीस नितीश रेड्डी आणि सलिल अरोरा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादने ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला.
प्रफुल्ल हिंगेचे ऐतिहासिक पदार्पण –
For his match-winning spell on his #TATAIPL debut, Praful Hinge is named the Player of the Match 🏅
Relive his performance ▶️ https://t.co/0krCOcyK55 #KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/rRonwHbuxy
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
प्रत्युत्तरात २१८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची भंबेरी उडाली. हैदराबादचा नवा शोध ठरलेल्या पदार्पणवीर प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने एकाच षटकात तीन बळी घेत इतिहास रचला. राजस्थानचे दिग्गज फलंदाज प्रफुल्लच्या जादुई स्पेलसमोर हतबल दिसले आणि संपूर्ण संघ ५७ धावा आधीच गारद झाला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत आपली स्थिती सुधारली असून राजस्थानला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.





