Rishabh Pant Catches : पंत आहे की पक्षी? हवेत उडून टिपले दोन अफलातून झेल; ‘त्या’ डाइव्हने तर पूर्ण स्टेडियम झालं अवाक! पाहा VIDEO
Rishabh Pant Catches : ऋषभ पंतने यष्टीमागे हवेत झेपावत दोन असे झेल टिपले, ज्यामुळे हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येच्या मनसुब्यांना सुरुंग लागला.

Rishabh Pant Diving Catches LSG vs SRH IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १० व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या चपळाईने सर्वांना थक्क केले आहे. फलंदाजीपूर्वी पंतने यष्टीमागे हवेत झेपावत दोन असे झेल टिपले, ज्यामुळे हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येच्या मनसुब्यांना सुरुंग लागला.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऋषभ पंतने आपल्या यष्टीरक्षणाचे जादुई दर्शन घडवले. हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असताना, पंतने यष्टीमागे चपळाई दाखवत दोन मोठे मासे जाळ्यात ओढले. या दोन्ही झेलांमुळे हैदराबादच्या डावाला खिंडार पडले आणि लखनौला सामन्यावर पकड मिळवता आली. आता ऋषभ पंतच्या चपळाईचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका हाताने टिपला लिविंगस्टोनचा ‘सुपर कॅच’
1 2 3 4… Rishabh Panti hardcore! 🤩😎
Rishabh Pant’s quick reflexes sends Liam Livingstone back to the dugout. Digvesh Rathi has his first wicket of the season. 👏#TATAIPL 2026 | #SRHvLSG| LIVE NOW 👉https://t.co/X6t7Rxs79d pic.twitter.com/hpMzuc8RJV
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2026
हैदराबादसाठी पदार्पण करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला पंतने ८ व्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. दिग्वेश राठीच्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने ‘पॅडल स्वीप’ मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा वेग कमी असल्याने तो बॅटची कडा घेऊन हवेत उडाला. चेंडू लेग साईडच्या दिशेने जात असल्याचे पाहून पंतने चित्त्याच्या वेगाने डाइव्ह मारली आणि एका हाताने अफलातून झेल पूर्ण केला. लिव्हिंगस्टोन केवळ १४ धावा करून बाद झाला.
क्लासेनच्या झंझावाताला लावला ‘ब्रेक’ –
Avesh Khan disrupts #SRH’s momentum 😤
🎥 Back to back wickets including a fine catch by skipper Rishabh Pant bring @LucknowIPL back in contest 👊
Updates ▶️ https://t.co/qC2rF1Hiiz#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvLSG pic.twitter.com/zFPWNdaZCs
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
अर्धशतक ठोकून अधिक आक्रमक झालेल्या हेनरिक क्लासेनला बाद करणे लखनऊसाठी अत्यंत गरजेचे होते. १९ व्या षटकात आवेश खानच्या चेंडूवर क्लासेनने ‘रिव्हर्स स्कूप’ खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला, तेव्हा पंतने हवेत झेपावत (Flying Catch) क्लासेनचा झेल टिपला. या एका विकेटमुळे हैदराबादची धावगती मंदावली. क्लासेन बाद झाल्यानंतर शेवटच्या ११ चेंडूंवर हैदराबादला केवळ १२ धावाच करता आल्या.





