SRH vs KKR : हेनरिक क्लासेनने वादळी शतकाच्या जोरावर रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. क्लासेनने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. वैभव अरोराच्या चेंडूवर दुहेरी धाव घेऊन त्याने हे यश मिळवले. क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून युसूफ पठाणची बरोबरी केली आहे. युसूफ पठाणने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ही कामगिरी केली होती.
Breathtaking and Belligerent 🫡
Describe Heinrich Klaasen’s second #TATAIPL 💯 in one word 👇
Scorecard ▶ https://t.co/4Veibn1bOs #SRHvKKR | @SunRisers pic.twitter.com/HOIgoCYtTO
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने ३० चेंडूत शतक झळकावले. त्यानंतर, यंदाच्याच हंगामात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावून अनेक महान खेळाडूंना मागे टाकले. तो सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्यानंतर आज हेनरिक क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून ही कामगिरी केली.
हेही वाचा – IPL 2025 Playoffs : गुजरातच्या पराभवानंतर टॉप-२ ची रेस रंजक! ‘या’ सामन्यानंतर चित्र होणार स्पष्ट
आयपीएलमधील सर्वात जलद शतक (चेंडूंच्या बाबतीत)
- ३० – ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, बंगळुरू, २०१३
- ३५ – वैभव सूर्यवंशी (आरआर) विरुद्ध जीटी, जयपूर, २०२५
- ३७ – युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध एमआय, मुंबई बीएस, २०१०
- ३७ – हेनरिक क्लासेन (एसआरएच) विरुद्ध केकेआर, दिल्ली, २०२५*
- ३८ – डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध आरसीबी, मोहाली, २०१३
शतक झळकावण्यापूर्वी, क्लासेनने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूत दोनदा अर्धशतक झळकावले आहे आणि अभिषेक शर्माने एकदा अर्धशतक झळकावले आहे. आज १७ चेंडूत अर्धशतक झळकावणारा क्लासेनही या यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा – GT vs CSK : गिल-सुदर्शनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय जोडी
आयपीएलमध्ये एसआरएचसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत):
- १६ – अभिषेक शर्मा विरुद्ध एमआय, हैदराबाद, २०२४
- १६ – ट्रॅव्हिस हेड विरुद्ध डीसी, दिल्ली, २०२४
- १६ – ट्रॅव्हिस हेड विरुद्ध एलएसजी, हैदराबाद, २०२४
- १७ – हेनरिक क्लासेन वि केकेआर, दिल्ली, २०२५*
हेनरिक क्लासेनने ३९ चेंडूत केल्या १०५ धावा –
सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेनने ३९ चेंडूत १०५ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने ९ षटकार आणि ७ चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७८ धावा केल्या. क्लासेन व्यतिरिक्त, ट्रॅव्हिस हेडने ७६, अभिषेक शर्माने ३२, इशान किशनने २९ आणि अनिकेत वर्माने १२ धावा केल्या.





