SRH vs GT : सिराजने अभिषेकला बाद करताच काव्या मारनने वेधलं सर्वांच लक्ष, रिॲक्शन होतेय व्हायरल

SRH vs GT Kavya Maran reaction viral after Siraj dismisses Abhishek : आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात २८६ धावांचा डोंगर उभा केला होता. जी आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र, त्यानंतर या संघाची फलंदाजी सातत्याने संघर्ष करताना दिसत आहे. ज्यामुळे त्यांना सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर चौथ्या सामन्यात गुजरातविरुद्धही तीच अवस्था पाहायला मिळाली. या सामन्यात मोहम्मद सिराजने अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल होत आहे.
आज सनरायझर्स हैदराबाद आपला चौथा सामना आपल्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळत आहेत. सलामीवीर ट्रॅव्हिस आणि अभिषेक हे हैदराबादचे सर्वात मोठे बलस्थान आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी क्रीजवर येताच आक्रमक फलंदाजी करण्यास ओळखली जायची. पण आता दोघेही फार काळ क्रीझवर तग धरण्यात अपयशी ठरताना दिसतात. गुजरातविरुद्ध पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला बाद केले. अभिषेकही जास्त काळ टिकू शकला नाही. डावाच्या पाचव्या षटकात सिराजने त्याला बाद केले. १६ चेंडूत १८ धावा काढल्यानंतर अभिषेक राहुल तेवतियाच्या हाती झेलबाद झाला.
काव्या मारनला आला राग –
https://twitter.com/rahulkatala/status/1908904093608808644
अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच मोकळेपणाने खेळू शकला नाही. सततच्या अपयशामुळे तो आपली विकेट वाचवण्याचा प्रयत्नही करत होता. या सामन्यात हैदराबादला पाठिंबा देण्यासाठी संघ मालक काव्या मारन देखील पोहोचली आहे. काव्या कधीही तिच्या मनातील भाव लपवत नाही. यावेळीही तेच घडले. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाल्यावर तिला राग आला. यामुळे संतापलेल्या काव्या मारनची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.
Kavya Maran angry expression after Travis and Abhishek gets out
Mat khelo 300 ke liye 😂#SRHvsGT #siraj #GTvSRH #kavyamaran #IPL2025 pic.twitter.com/JddNFP11ms— CrickStudd (@CrickStudd) April 6, 2025
काव्या जी हँसती मुस्कुराती ही अच्छी लगती है,
उनकी टीम की ये हालत देखी नहीं जा रहीं है.. 😭#SRHvGT#kavyamaran pic.twitter.com/JeqYegkB7R— ASHISH SINGH (@ASHISHS_45) April 6, 2025
हेही वाचा – SRH vs GT : शुबमनने विराटची विकेट घेणाऱ्याला प्लेइंग इलेव्हनमधून दिला डच्चू, ‘या’ खेळाडूला दिली संधी
सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादसाठी नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ३१ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर क्लासेनने २७ धावा केल्या. अभिषेक शर्माने १८ धावांचे योगदान दिले. कर्णधार पॅट कमिन्स २२ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १७ धावा देत ४ विकेट्स घेतले. प्रसिध कृष्णाने ४ षटकांत २५ धावा देत २ विकेट्स घेतले. साई किशोरनेही २ विकेट्स घेतल्या.





