Steve Smith Angry : स्टीव स्मिथचा संताप! बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतताना आपटली बॅट, VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Angry : स्टीव स्मिथचा ड्रेसिंग रूममधील संताप सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Steve Smith Angry Reaction Video Viral PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात मुल्तान सुल्तांसचा प्रवास संपुष्टात आला आहे. गद्दाफी स्टेडियम, लाहौर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबाद किंग्समेनने मुल्तान सुल्तांसचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथचा ड्रेसिंग रूममधील संताप सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
पाकिस्तान सुपर लीगच्या ११ व्या हंगामातील पहिल्या एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुल्तानचा संघ २० षटकांत ९ बाद १५९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असलेल्या स्टीव स्मिथने १० चेंडूंत केवळ १३ धावा केल्या.
स्टीव स्मिथचा ड्रेसिंग रूममध्ये संताप –
🤯STEVE SMITH LOSES HIS TEMPER 😳
.Steve Smith looked frustrated while walking back to the dressing room.
.He reacted in anger and threw his bat after Maaz Sadaqat’s aggressive celebration following his dismissal. pic.twitter.com/J13VNkseGF
— Talha Nawaz (@TalhaDigital007) April 29, 2026
मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर स्मिथ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला आणि रागाच्या भरात त्याने आपली बॅट जमिनीवर आपटली. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. स्मिथसाठी पीएसएल २०२६ चा हंगाम फारसा चांगला गेला नाही. त्याने ११ डावांत १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ३८० धावा केल्या.
हैदराबादचा शानदार विजय –
प्रत्युत्तरात १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद किंग्समेनच्या माज सदाकत आणि उस्मान खान यांनी प्रत्येकी ६४ धावांची नाबाद खेळी करत संघाला १५.२ षटकांतच शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादने अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात १ मे रोजी त्यांचा सामना इस्लामाबाद युनायटेडशी होईल. या सामन्यातील विजेता संघ ३ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत पेशावर जाल्मीविरुद्ध भिडेल.





