Ishan Kishan SRH Captain : आयपीएल २०२६ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने अचानक बदलला कर्णधार, ‘या’ खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा
Ishan Kishan SRH Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे एसआरएच संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे.

Ishan Kishan SRH Captain IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने आपल्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत, हैदराबादने भारताचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तसेच अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. Ishan Kishan SRH Captain
इशान किशनवर का दाखवला विश्वास? Ishan Kishan SRH Captain
इशान किशनने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. २०२५ च्या मेगा लिलावात हैदराबादने इशानला ११ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले होते. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू होता. इशानच्या नावावर आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत २९९८ धावांची नोंद असून, त्याने १ शतक आणि १७ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म लक्षात घेता व्यवस्थापनाने त्याच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓 🚨
Pat Cummins will miss a few games while recovering from injury.
Until he recovers, Ishan Kishan will be the Captain and Abhishek Sharma will be the Vice-Captain. pic.twitter.com/etXJUkQJeG
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 18, 2026
पॅट कमिन्स कधी परतणार?
सनरायझर्स हैदराबादने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती दिली की, पॅट कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंतच इशान किशन संघाचे नेतृत्व करेल. कमिन्स संघात परतताच तो पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. तोपर्यंत इशान आणि अभिषेक या युवा जोडीवर हैदराबादचे नशीब अवलंबून असेल.
आरसीबीविरुद्ध होणार पहिला सामना – Ishan Kishan SRH Captain
सनरायझर्स हैदराबाद आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध करेल. विशेष म्हणजे, आरसीबी हा गतविजेता संघ असून पहिल्याच सामन्यात इशान किशनसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यानंतर ५ एप्रिल रोजी हैदराबादचा संघ लखनऊ सुपर जायंट्सशी आपल्या घरच्या मैदानावर भिडणार आहे.





