Cricketer S Sreesanth booked in cheating case : भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीशांत (S. Sreesanth) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीशांतविरुद्ध केरळमध्येही गुन्हा दाखल केला आहे. त्यात श्रीशांतसोबत त्याच्या दोन जवळच्या मित्रांचीही नावे आहेत. उत्तर केरळ जिल्ह्यातील एका व्यक्तीने दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सरिश गोपालन (Sareesh Gopalan) यांनी आरोप केला आहे की, आरोपी राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि व्यंकटेश किणी (Venkatesh Kini) यांनी श्रीशांतच्या सहकार्याने स्पोर्ट्स अकादमी स्थापन करण्याचा दावा करून 25 एप्रिल 2019 पासून वेगवेगळ्या तारखांना 18.70 लाख रुपये उकळले. ही अकादमी कर्नाटकातील कोल्लूर येथे स्थापन केली जाणार होती. सरिशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला अकादमीचा भागीदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती, ज्यासाठी त्याने पैसे गुंतवले. या प्रकरणी एस श्रीशांत आणि इतर दोघांविरुद्ध आयपीसी कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीशांतचा उल्लेख करण्यात आला आहे. #INDvAUS T20 Series : पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमारची झाली नाचक्की; जाणून घ्या,नेमक काय झालं… हरभजन सिंगसोबत झाला होता वाद … श्रीशांत काही वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2008 मध्ये त्याचा हरभजन सिंगसोबत वाद झाला होता. त्यानंतर श्रीशांत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून खेळायचा आणि हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. एका सामन्यादरम्यान दोघांमधील वाद इतका वाढला की, लाईव्ह मॅचमध्ये हरभजनने श्रीसंतला थप्पड मारली. परिणामी हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली. श्रीशांत अन् स्पॉट फिक्सिंग… 2013 च्या आयपीएल दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत आणि त्याचे दोन सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्वजण आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. बोर्डाच्या तपासणीत सर्व आरोप खरे ठरले आणि श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली. तथापि, 2015 मध्ये दिल्ली न्यायालयाने पुराव्याअभावी श्रीसंतला ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी सात वर्षांची केली. बंदी उठल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व केले.