स्पृहा जोशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; बॉलीवूडमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार

मुंबई – मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) चित्रपटांसह मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाने तिने स्वत:ची एक वेगळी निर्माण केली आहे. आता लवकर स्पृहा एका बॉलीवूड चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
स्पृहाच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘सब मोह माया है’ असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत स्पृहानं कॅप्शन दिलं आहे की ‘बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौद फॉर मिश्रा परिवार’. या चित्रपटात स्पृहा जोशी अभिनेता शरमन जोशीच्या पत्नीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पृहाच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
या ट्रेलरमध्ये एक मिश्रा कुटुंब असल्याचे पाहायला मिळते. वडील आणि मुलामध्ये असलेलं वेगळं नात या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या कुटुंबातील वडिलांची भूमिका अभिनेता अन्नू कपूर साकारत आहेत तर मुलाची भूमिका हा अभिनेता शरमन जोशी साकारत आहे. वडिलांकडे सरकारी नोकरी असल्याने मुलाकडे देखील सरकारी नोकरी असायला हवी, अशी त्यांची इच्छा असते.
पण या कुटुंबासमोर अनेक अडथळे असल्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उपाय करतानाच त्यांच्या अडचणी कशा वाढतात हे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, स्पृहा यापूर्वी देखील हिंदी चित्रपटात काम केले आहे ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘अटकन चटकन’ या चित्रपटात ती पाहायला मिळाली होती.





