Sports In Pune : चॅम्प्स करंडक U-12 क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंटस अकादमीची विजयाची हॅटट्रीक…
Updated On:

पुणे :- चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ब गटात ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
धायरी येथील डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत श्रेय असलेकर(नाबाद २००) याने केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने पीबीकेजेसीए संघाचा १०५ धावांनी पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम राखली.
दुसऱ्या सामन्यात आयुश मांडवकर(३-१७) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर साई एमजे स्पोर्टस अकादमी संघाने सहारा क्रिक किंगडम संघाचा ५ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.





