Sports In Pune : टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत ‘जान्हवी चौगुले’ची अंतिम फेरीत धडक…

पुणे – एम टेनिस अकादमी व शेपींग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत मुलांच्या गटात स्मित उंडरे, अथर्व येलभर यांनी, तर मुलींच्या गटात श्रावी देवरे, जान्हवी चौगुले यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंडरेने आपली विजयी मालिका कायम ठेवत स्वर्णिम येवलेकरचा 6-4, 6-3 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. अथर्व येलभर याने आर्यन किर्तनेचा 6-4, 6-2 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम राखली.
मुलींच्या गटात श्रावी देवरेने काव्या देशमुखचा 6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जान्हवी चौगुलेने रित्सा कोंडकर 3-6, 6-4, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात स्वर्णिम येवलेकर व नमिश हुड या जोडीने आश्रित मज्जी व आरुष पोतदार यांचा 6-0, 6-3 असा तर, समिहन देशमुखने सनत कडलेच्या साथीत वैष्णव रानवडे व शौनक शहा यांचा 6-2, 6-2 असा पराभव केला. मुलींच्या गटात काव्या देशमुख व श्रेया होनकन यांनी अनुष्का जोगळेकर व अवनी देसाई यांचा 6-0, 7-5 असा तर, सारा फेंगसे व प्रार्थना खेडकर यांनी जान्हवी चौगुले व मायरा टोपनो यांचा 6-1, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.





