मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे, कचरा टाकणे पडणार महागात..
Updated On:

मुंबई – मुंबईतील रस्त्यावर थुंकणाऱ्या अथवा कचरा टाकणाऱ्यांना आता आर्थिक दंडाला सामोरे जावले लागणार आहे. महापालिकेने अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. हे मार्शल्स रस्त्यांवर थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड ठोठावणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक पालिका वॉर्डात आता 30 क्लीनअप मार्शल तैनात करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर मंगळवारपासून त्याची सुरूवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डात सुमारे 720 मार्शल तैनात करून शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसूल करतील. या कारवाईत दंडाची रक्कम कमीत कमी 100, तर जास्तीत जास्त 1 हजार रुपये असेल.





