उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ, थकवा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी अनेकांना मोबाईल आणि लॅपटॉपवर बऱ्याचवेळ काम करावे लागते. आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्याचा आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. आपले डोळे अतिशय संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही बऱ्याचजणांची अपुर्ण झोप होते. त्याचा सर्व परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यामुळे आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.
कोल्ड कॉम्प्रेस
कोल्ड कॉम्प्रेसमुळे डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी, आपल्याला बर्फाचे काही तुकडे सूती कपड्यात ठेवावे लागतील आणि नंतर ते कपडा डोळ्यावर थोडावेळ ठेवावा लागेल. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळेल.
काकडी
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडींपेक्षा चांगले काहीही नाही. काकडीचे दोन तुकडे करून ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काकडी थंड झाल्यावर ते सुमारे 10 मिनिटांसाठी डोळ्यावर लावा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
गुलाब पाणी
डोळ्यांचा थकवा आणि जळजळपासून मुक्त करण्यासाठी गुलाबाच्या पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो. गुलाबाच्या पाण्यात कापूस भिजवा आणि तो आपल्या डोळ्यांवर ठेवा. याशिवाय डोळ्यात गुलाबाचे पाणी एक ते दोन थेंब डोळ्यांत घाला. यामुळे डोळे थंड होतील.
बटाटा
बटाटा डोळ्याचा थकवा आणि पाणी काढून टाकण्यासाठी वापरले जाऊ शकते. काकडीप्रमाणे बटाट्याचे बारीक तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर डोळ्यावर लावा आणि झोपून घ्या. असे केल्याने डोळ्यांची गडद डार्क सर्कल कमी होतील.





