Ketan Aggarwal : केतन अग्रवाल प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध वकिलाची एन्ट्री; फडणवीसांचा मोठा निर्णय, सिया गोयलच्या अडचणी वाढणार
Ketan Aggarwal : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Ketan Aggarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या बहुचर्चित प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. (Ketan Aggarwal)
तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ketan Aggarwal)
मुख्यमंत्र्यांची भेट, मागणीला तत्काळ मंजुरी
१८ जून रोजी लोहगडावरून खाली पडल्याने केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. (Ketan Aggarwal)
दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. त्यांनी या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाला आवश्यक निर्देश दिले. (Ketan Aggarwal)
सीएमओची अधिकृत माहिती
मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसूर केली जाणार नाही. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, उज्ज्वल निकम यांनीही ही जबाबदारी स्वीकारण्यास संमती दिली आहे.” (Ketan Aggarwal)
सियाच्या भावाची पोलिसांकडून चौकशी
दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी बोलावले असून, त्याचा सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. (Ketan Aggarwal)
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, साहिल गोयलला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, तो पोलिसांना सहकार्य करत आहे. तपास पथक कागदोपत्री आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या सर्व आरोपांच्या अनुषंगाने प्रत्येक बाब गांभीर्याने तपासली जात आहे. (Ketan Aggarwal)






