पुण्यात ‘कम्फर्ट केअर कॅम्पेन’ अंतर्गत विशेष कार्यक्रम ; रुग्णांना आराम आणि आधार देण्यावर भर

‘कम्फर्ट केअर कॅम्पेन’ ही सेवा-सुश्रुषेची मोहीम आराम, करुणा आणि मानवतावाद यांचा मेळ घालणारा उपक्रम आहे. या मोहिमेअंतर्गत १ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात आरोग्यसेवेच्या या महत्त्वाच्या घटकावर अधोरेखित केले जाईल. मेंदू आणि मनाचे स्वास्थ्य एकमेकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असते. मलेरिया किंवा न्यूमोनियासारखे काही आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात, परंतु न्यूरोलॉजीमध्ये स्ट्रोक, अपघातातील मेंदूच्या इजा, पार्किन्सन, डिमेन्शिया, अल्झायमर, न्यूरोपॅथी किंवा मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या आजारांना कायमचा इलाज नसतो. अशा परिस्थितीत उपचारांचा भर नियंत्रण (कंट्रोल), पुनर्वसन आणि ‘कम्फर्ट केअर’वर असतो. यात रुग्णाला शारीरिक व मानसिक आराम देणे, लक्षणांवर नियंत्रण ठेवणे आणि कुटुंबीयांना समुपदेशन देणे यांचा समावेश होतो.
या कार्यक्रमाचे दोन मुख्य भाग असतील: ‘बोलावा विठ्ठल’ आणि ‘मृत्युंजय’. संगीत, ज्ञान आणि सहभाग यांचा मेळ घालून ‘बेटर न्यूरो केअर’कडे नेमका मार्ग दाखवणारा हा उपक्रम आहे.
१. ‘बोलावा विठ्ठल’ – सांगीतिक कार्यक्रमहा भाग पुनर्वसन आणि पॅलिएटिव्ह केअरबाबत माहिती देणारा सांगीतिक कार्यक्रम असेल. यात संगीत, अर्थपूर्ण गाणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे संमिश्रण असेल. ‘कम्फर्ट केअर’, ‘न्यूरो-रिहॅबिलिटेशन’ आणि ‘न्यूरोपॅलिएशन’ या विषयांवर चर्चा होईल.
- न्यूरो-रिहॅबिलिटेशन: मेंदूच्या इजा किंवा न्यूरोलॉजिकल आजारांमुळे कमी झालेली कार्यक्षमता पुन्हा सुधारण्यासाठी व्यायाम आणि थेरपींचे माध्यम वापरणे.
- न्यूरोपॅलिएशन: वेदना कमी करणे, लक्षणांवर नियंत्रण ठेवणे आणि पूर्ण बरे होणे शक्य नसलेल्या परिस्थितीत रुग्णाला आराम देणे. या दोन्ही पद्धतींमुळे रुग्ण आत्मसन्मानाने आणि सलुजतने जीवन जगू शकतो.
कलाकार : डॉ. अनुराधा गोगटे, सुशांत कुलकर्णी, डॉ. शुभम कुलकर्णी.
संचालन : डॉ. पूर्णिमा गौरी.
तर दुसऱ्या भागात म्हणजेच ‘मृत्युंजय’ – व्याख्यान आणि चर्चा सत्रजीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही रुग्णाला आराम आणि सन्मान देण्यावर भर देणारा हा भाग आहे. यात ‘अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह’ आणि ‘लिव्हिंग विल’ (इच्छापत्र) यांचे महत्त्व सांगितले जाईल. हे म्हणजे गंभीर किंवा शेवटच्या अवस्थेत कोणत्या उपचारांची इच्छा आहे किंवा नाही हे नमूद करणे.
- डॉ. शुभम कुलकर्णी (आयुर्वेदाचार्य, म्युझिक थेरपिस्ट)
- डॉ. विहिता कुलकर्णी (न्यूरोलॉजिस्ट, सल्लागार फिजिशियन)
- डॉ. ज्योती शेंडगे (इंटेन्सिविस्ट)
- अॅड. रोहित एरंडे (लेखक, वकील)
या सत्रात पब्लिक हेल्थ प्रोफेशनल आणि ‘लिव्हिंग विल’ विषयावरील लेखिका यांच्या संचालनात तज्ज्ञ व्याख्याने आणि चर्चा होतील. ‘कम्फर्ट केअर कन्सल्टेशन’ या विषयावर आयसीयूच्या संदर्भात चर्चा होईल, ज्यात वैद्यकीय हस्तक्षेप कधी उपयोगी ठरत नाहीत हे स्पष्ट केले जाईल.या कार्यक्रमात ‘लिव्हिंग विल क्लिनिक’ची घोषणा केली जाईल, जी ब्रेन अँड माइंड सेंटर, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल येथे सुरू होत आहे. येथे व्यक्तींना लिव्हिंग विल तयार करण्याबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन दिले जाईल, तसेच शेवटच्या टप्प्यातील ‘कम्फर्ट केअर’साठी योजना आखण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी सुरभी जोशी (कोऑर्डिनेटर, कम्फर्ट केअर कॅम्पेन) – +९१ ९१७२९ ०२७०२. यांच्याशी संपर्क साधावा.





