सचिन पिळगांवकरांसाठी लेक श्रियाची खास पोस्ट; म्हणाली “रॉकस्टार…”

Shriya Pilgaonkar | ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, निर्मिती सावंत, विजय पाटकर यांसह श्रिया पिळगांवकरने देखील काम केले आहे. यात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाच्या यशानंतर श्रियाने वडील सचिन पिळगांवकर यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
श्रियाची खास पोस्ट
श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “आजचा दिवस खास आहे, कारण-आज ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटसृष्टीत ६१ वर्षे काम करत असताना माझ्या वडिलांनी दिग्दर्शन केलेला हा २१ वा चित्रपट आहे. हे कल्पनेतसुद्धा अद्भूत आहे. यावेळी त्यांनी चित्रपट डिस्ट्रिब्यूट करण्याच्या निर्णय घेतला होता. हा चित्रपट बनत असताना मला पप्पांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक हे सर्व हाताळणे सोपे नाही. तो खरोखरच वन-मॅन आर्मी आहे. खूप तणावपूर्ण दिवसांतही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे.” Shriya Pilgaonkar |
View this post on Instagram
“तो नेहमी म्हणायचा, ‘मला प्रत्येक गोष्ट आवडते. मला चांगले आव्हान आवडते.’ त्याचे पडद्यामागून निरीक्षण करून मी खूप काही शिकले आहे. मला साहजिकच या सिक्वेलचा भाग व्हायचं होतं. त्यामुळे चित्रपटातील गणपतीच्या गाण्यातही कॅमिओ केला आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल देखील आभार! गणपती बाप्पा आणि तुमच्या आशीर्वादाने हे घडू शकले आहे. पापा, तुम्ही इंडस्ट्रीत ६१ वर्षे काम करत असलात तरी माझ्यावर विश्वास ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहे. रॉकस्टार मला तुझा गर्व वाटत आहे. गणपती बाप्पा मोरया,” असे श्रियाने म्हंटले आहे. Shriya Pilgaonkar |
दरम्यान, 2004 साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात गणपतीपुळ्याचा प्रवास सर्वांनी एसटीने केला होता. या सिनेमातील अभिनेते अशोक सराफ यांनी ‘लालू कंडक्टर’ची भूमिका साकारली होती. या भागात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर त्यांच्या प्रवाशांसह रेल्वेने प्रवास करत असल्याचे दाखवण्यात आले असून यात अशोक सराफ हे टीसीच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा:
झारखंड निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची कारवाई ; हेमंत सोरेन यांच्या वैयक्तिक सल्लागाराच्या घरावर छापा





