सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीसाठी खास पोस्ट

Siddharth Chandekar | अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतेच त्याने पत्नी मिताली मयेकरसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थने इन्स्टाग्रामटवर मितालीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मितालीने सिद्धार्थचा हात धरला असून, ती गोल गिरक्या घेत वेगळ्या ठिकाणी दिसत आहे. या पोस्टला सिद्धार्थने, “असाच हात घट्ट पकडून ठेव. अख्खं जग बघू एकत्र! हॅपी बर्थडे माझी भिंगरी”, असे कॅप्शन देत मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Siddharth Chandekar |
View this post on Instagram
सिद्धार्थ आणि मिताली दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याचा आनंद घेतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची युरोप टूर केली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर दोघांनी फोटोशूट केलं होतं. त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले होते. त्यांनी इटली टुरचे देखील फोटो शेअर केले होते. Siddharth Chandekar |
दरम्यान, अनेकदा मितालीला सोशल मीडियावर हॉट फोटोंमुळे ट्रोलही केले जाते. मात्र ट्रोल करणाऱ्यांना मिताली देखील सडेतोड उत्तर देताना दिसते.
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या ‘झिम्मा 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सिद्धार्थ ‘ओले आले’ हा चित्रपटही दिसला. यात नाना पाटेकर, सायली संजीव यांचीही प्रमुख भूमिका होती. त्याने वयाच्या 19 व्या वर्षी ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा:
ग्राहकांनो…! सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा ‘लेटेस्ट दर’





