उन्हाळ्यासाठी वाहन उत्पादकांकडून विशेष योजना

नवी दिल्ली – यंदाचा उन्हाळ्याचा काळ सर्वाधिक उष्ण असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना कमी त्रास व्हावा याकरिता कार कंपन्या प्रयत्न करीत आहेत. निस्सान कंपनीने निस्सान व डॅटसन वाहनांसाठी मोफत एसी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
इतरही कंपना अशा सुविधा ग्राहकांना देण्यासाठी विचार करीत आहेत. या शिबिराला 15 एप्रिलपासून सुरुवात होत असून ते 31 मे पर्यंत सुरू राहील. निस्सान व डॅटसनच्या वितरण केंद्रामध्येमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
निस्सान मोटार इंडियाचे महा-व्यवस्थापक अतुल अगरवाल म्हणाले, निस्सान आपल्या ग्राहकांना नेहमीच अनोखा विक्री व विक्रीपश्चात्त अनुभव देण्याचा प्रयत्न करते. आता कडक उन्हाळ्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतला आहे. निस्सान व डॅटसन ब्रॅण्ड्सच्या ग्राहक समाधानाप्रती असलेल्या कटिबद्धतेला ग्राहकांनी देखील मान्यता दिली आहे. जे. डी. पॉवरच्या अहवालानुसार निस्सान व डॅटसन कंपन्या ग्राहक समाधानासाठी प्रयत्न करतात.




