सॅमसंग युजर्ससाठी खास ऑफर, हे मोबाईल झाले स्वस्त

नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्ट मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपल्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. सॅमसंग कंपनीने आपले अँड्रॉईड मोबाईल चक्क 7 हजार रुपयांनी स्वस्त केले आहेत. सॅमसंग कंपनीने मागील आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये नवीन मोबाईल घेणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
सॅमसंग, Galaxy Z Flip, Galaxy Note 10 Lite सह अन्य स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. सॅमसंगने फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 7 हजार रुपयांनी कमी केली आहे. या स्मार्टफोनची किंमत आता 1 लाख 15 हजार 999 रुपयांवरून 1 लाख 8 हजार 999 रुपये झाली आहे.
Galaxy A31, Galaxy A21s या स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. Galaxy A51 ची किंमत 1 हजार रुपये कमी करण्यात आली आहे. 8 जीबी रॅमच्या या फोनची किंमत आता 26 हजार 999 रुपये झाली आहे. Galaxy A31 या स्मार्टफोनची किंमतही 1 हजार रुपये कमी करण्यात आली आहे.








