Entertainment । साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य त्याच्या नवीन चित्रपट ‘थंडेल’च्या तयारीला लागला आहे. चंदू मोंडेती दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टमध्ये सई पल्लवी सुद्धा दिसणार आहे. ‘थंडेल’ची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अशात आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठी अपडेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट सुरुवातीला 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट आता डिसेंबरच्या रिलीजच्या वेळापत्रकामुळे किंवा थिएटर रिलीजमुळे लांबणीवर जाणार असल्याची शक्यता आहे. साउथ सुपरस्टार राम चरणचा ‘गेम चेंजर’, विष्णू मंचूचा ‘क्नाप्पा’ आणि नीतिनचा ‘रॉबिनहूड’ हे सर्व डिसेंबरमध्ये रिलीज होण्यासाठी नियोजन करत आहे, त्यामुळे ‘थंडेल’ आता जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होऊ शकते. रिलीजच्या तारखेबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. साई पल्लवी आणि नागा चैतन्य पुन्हा एकदा ‘थंडेल’मध्ये एकत्र येणार आहेत. याआधी दोघांनी शेखर कममुलाच्या ‘लव्ह स्टोरी’मध्ये एकत्र काम केले होते. नागा चैतन्यला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण अलिकडच्या वर्षांत त्याला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले आहे. या चित्रपटाची निर्मिती गीता आर्ट्स करत असून, संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. अशीही माहिती आहे की देवीप्रसाद यांनी दोन गाण्यांचे रि-रेकॉर्डिंग आधीच पूर्ण केले आहे. दरम्यान, चंदू मोंडेटी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘थंडेल’ची कथा 2018 साली घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काही मच्छिमार चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले, जिथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.