दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! सोन्याच्या खाणीत अडकलेल्या १०० कामगारांचा मृत्यू ; आणखी काही कामगार अडकले ?

South Agrica Gold Mines । दक्षिण आफ्रिकेतून दुर्दैवी घटना समोर येत आहे. त्याठिकाणच्या एका बेकायदेशीर खाणीत १०० कामगारांच्या मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खाणीत अडकलेले हे कामगार अनेक महिने भूकेने आणि तहानने व्याकूळ होते असे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेन शहराजवळील बफेल्सफोंटेन याठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणींमध्ये सुमारे १०० कामगार अडकले होते. जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा ते भूकेने आणि तहानेने मरण पावले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या घटनेची माहिती कामगारांनी मोबाईल फोनद्वारे पाठवलेल्या व्हिडिओवरून मिळाली, ज्यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह दिसत आहेत.
मायनिंग अॅफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन अॅक्शन ग्रुपच्या मते, आतापर्यंत २६ कामगारांना जिवंत वाचवण्यात आले आहे आणि बचाव कार्यादरम्यान १८ मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. त्यासोबतच ही खाण इतकी खोल आहे की सुमारे ५०० कामगार अजूनही तिथे अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खाणीची खोली २.५ किमी असल्याचे सांगितले जाते.
🇿🇦🚨 #BREAKING: At least 100 illegal miners have died in an abandoned gold mine in South Africa after being trapped underground for months!
According to Sabelo Mnguni, a spokesperson for the Mining Affected Communities United in Action Group, the miners, who were stuck in a… pic.twitter.com/iOCT8Lleh4
— TabZ (@TabZLIVE) January 13, 2025
पोलिस आणि कामगारांमध्ये झटापट South Agrica Gold Mines ।
पोलिसांनी खाण सील करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कामगार आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला. अटकेच्या भीतीमुळे कामगार बाहेर येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर कामगारांचा आरोप आहे की पोलिसांनी त्यांचे दोरखंड काढून टाकले ज्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत.
भूक आणि तहानेने मृत्यू South Agrica Gold Mines ।
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पहिल्या मृत्यूचे कारण भूक असल्याचे सांगण्यात आले आहे. खाणीतील अन्न आणि पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे सर्व कामगारांचा मृत्यू झाला. कामगारांच्या मृत्यूमुळे खाणीच्या सुरक्षिततेबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बेकायदेशीर खाणकामाची पद्धत
दक्षिण आफ्रिकेत बेकायदेशीर खाणकाम ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा मोठ्या कंपन्या खाणींना निरुपयोगी समजून सोडून देतात, तेव्हा स्थानिक खाण कामगार तिथे उरलेले सोने काढण्याचा प्रयत्न करतात. ही धोकादायक परिस्थिती त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी, शिवसेनेच्या बैठकीत ठराव





