साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टी घेतली तब्ब्ल 5 कोटी फीस

South actress Anushka Shetty । साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अशात अनुष्काचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्का नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.
अनुष्का ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ मधून संपूर्ण भारताची स्टार बनलेली आहे. तर आता अनुष्का कथानार-द वाइल्ड सॉर्सर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी अनुष्का शेट्टीने 5 कोटी रुपये फी घेतल्याची चर्चा आहे.
कथनार हा एक काल्पनिक थ्रिलर आहे, ज्याला बनवण्यासाठी 75 कोटी रुपये खर्च आला आहे. या चित्रपटात अनुष्का शेट्टीची महत्त्वाची भूमिका असून आहे. यासाठी तिला ५ कोटी रुपये मानधन दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
रिपोर्टनुसार, फिल्म इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण करणाऱ्या अनुष्का शेट्टीला ‘बाहुबली’पूर्वी 3 कोटी रुपये फी मिळत होती. अनुष्काने तिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी’साठी 6 कोटी रुपये घेतले होते. पण आता तिला त्याच्या मल्याळम डेब्यूसाठी 5 कोटी रुपये मिळाल्याच्या बातम्या येत आहे.
अनुष्का शेट्टीबद्दल सांगायचे तर तिने 2005 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती तामिळ ते तेलुगू आणि आता मल्याळम चित्रपटांमध्ये काम करत आहे, पण ती बॉलिवूडची आहे. मात्र, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला काही चांगल्या ऑफर मिळाल्यास ती नक्कीच बॉलिवूडमध्ये काम करेल.
हे वाचाल का ? भाजपने उमेदवारी जाहीर करताच अजित पवार गटाला गळती; ‘हा’ मोठा नेता शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत





