कोलकाता – बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) अध्यक्षपदाची (Sourav Ganguly to contest for Cricket Association of Bengal’s president post) निवडणूक लढवणार आहे. गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला होता. त्यावेळी त्याने आणखी एक टर्म मिळण्याबाबत बैठकीत चर्चा करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, संघटनेतील अनेक सदस्यांनी त्याला विरोध केल्याने त्याला बीसीसीआयमधून बाहेर पडावे लागले.
आता गांगुली यांच्या जागी माजी कसोटी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती होणार आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी त्यांची ही नियुक्ती बिनविरोध होणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
बीसीसीआयमधून बाहेर पडावे लागले असले तरीही गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, गांगुली हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांचे नामांकन करण्यासही बीसीसीआयमधील काही सदस्यांनी नकार दिल्याने त्यांना आता बॅक टू पॅव्हेलियन आपल्याच राज्याच्या संघटनेवर काम करावे लागणार आहे.
BCCI President Election : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ‘रॉजर बिन्नी’ यांचीच होणार निवड, तर सचिव जय शहा…
गांगुली यांनी यापूर्वीदेखील बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते 2015 ते 2019 या कालावधीत संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते 2019 साली बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.