Lok Sabha : लवकरच महागाई आणखी नियंत्रणात येईल – अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली – महागाई कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच महागाई आणखी नियंत्रणात येईल. सरकारच्या प्रयत्नांमुळे नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.88 टक्क्यांवर आली. यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ लवकरच कमी होईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत दिली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की…अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. महागाई नियंत्रणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ती आणखी कमी करण्यासाठी सरकार सर्वसामान्यांसाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले.
✅ WPI inflation has come down to 21-month low of 5.85%.
✅ Wholesale Food inflation is at 2.17%.
✅ CPI inflation is at 11-month low of 5.88% within the tolerable band of RBI.
– Smt @nsitharaman in Lok Sabha. pic.twitter.com/9FyisyCmOz
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) December 14, 2022
डाळी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती अनौपचारिक मंत्र्यांच्या गटाद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. ही एक आंतर-मंत्रालयीय समिती आहे, जी दर आठवड्याला कृषी व जीवनावश्यक वस्तुंवर बैठक घेते. या सर्व गोष्टींवर सरकार बारकाईने निरीक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यापासून घसरत आहे. ऑक्टोबरमध्ये तो एक आकडी म्हणजेच 8.39 टक्क्यांवर आला होता. नोव्हेंबर 2022 पूर्वी महागाईचा सर्वात कमी स्तर फेब्रुवारी 2021मध्ये होता. त्यावेळी तो 4.83 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 1.07 टक्क्यांवर होता, जो आधीच्या महिन्यात 8.33 टक्के होता.
MVA Mahamorcha : परवानगी द्या अगर नका देऊ, आम्ही मोर्चा काढणारच – अजित पवार
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याबद्दल सदस्यांच्या चिंतेला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, इतर उदयोन्मुख बाजार आणि आशियाई चलनांपेक्षा रुपयाची स्थिती चांगली आहे. तसेच भारताचा परकीय चलन साठा हा जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय राखीव समुहांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.





