Sonu Sood Wife Accident : सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टरांनी सांगितले हेल्थ अपडेट

Sonu Sood Wife Accident – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. यामध्ये सोनू सूदची पत्नी जखमी झाली आहे. मात्र, सोनू सूदची पत्नी सुखरुप असून चिंता करण्यासारखी बाब नसल्याचे सांगितले जात आहे. सोनाली सूदची कार एका कारला धडकल्याची माहिती आहे.
अपघातावेळी कारमध्ये सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला देखील होती. कार एका ट्रकला धडकली. मात्र, कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. दरम्यान, पत्नी सोनाला भेटण्यासाठी सोनू सूद आज (दि.25) नागपूरमध्ये पोहोचला आहे.
#WATCH | Nagpur, Mahrashtra | Sonu Sood’s wife, Sonali Sood, and sister-in-law, Sunita, got injured in an accident on the flyover located on Wardha Road in Nagpur. The car in which Sonali Sood was sitting hit the truck from behind. The accident happened at 10.30 pm on Monday… pic.twitter.com/wJaBMHVPBx
— ANI (@ANI) March 25, 2025
सोनू सूदने 1996 मध्ये केला होता सोनालीशी विवाह :
View this post on Instagram
सोनू सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. ती एक तेलुगू आहे, जी मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनू सूदला अयान आणि इशांत अशी दोन मुले आहेत.
सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. तो व्यवसायाने प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे, सोनू आणि सोनाली सूद यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत नसतात.
अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या सोनू सूदची पत्नी सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते. ती सामाजिक कार्यांमध्ये सोनूला मदत करते.





