चला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली होती. यातच त्याने पुन्हा एकदा रोजगार गमावलेल्या मजुरांसाठी ई रिक्शा ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत तो मजुरांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहे.
त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “चांगल्या भविष्यासाठी एक लहानसा प्रयत्न. ज्या बेरोजगार लोकांना व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे त्यांना ई-रिक्शा उपलब्ध करुन देतोय. चला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.” त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इच्छूकांनी [email protected] या इमेल आयडीवर मदतीसाठी अर्ज करावा.
दरम्यान, बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली आहे.





