Taarak Mehta : ‘तारक मेहता..’च्या सोनूने मोडला करार? स्वतः पलक सिधवानी म्हणाली, ‘हा सगळा…’

Taarak Mehta | Palak Sidhwani : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची सोनू म्हणजेच, अभिनेत्री ‘पलक सिधवानी’ साध्य चांगलीच चर्चेत आहे. शोच्या कॉन्ट्रॅक्टचे काही नियम तिने मोडल्याचा दावा तिच्याबद्दल केला जात होता, त्यानंतर निर्माते तिला कायदेशीर नोटीस देणार आहेत. पण दरम्यान अभिनेत्रीने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा सोनू उर्फ पलक सिधवानी निर्मात्यांसोबत सुरू असलेल्या तणावामुळे चर्चेत आहे. तिने शोच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे बोलले जात होते. आता पलक सिधवानीने या मोठ्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत, असे काहीही झालेले नाही.
View this post on Instagram
शोचे निर्माते असित कुमार मोदी अभिनेत्री पलक सिधवानीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. तिने शोच्या विशेष कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर निर्मात्यांनी तिला यापूर्वी इशाराही दिला होता. मात्र अभिनेत्रीने हे दावे फेटाळून लावले आहेत.
अभिनेत्रीने सांगितले सत्य…
आता पलक सिधवानी यांनी ‘मनी कंट्रोल’ला दिलेल्या निवेदनात सांगितले की, हे सर्व खोटे आहे. असे काहीही झालेले नाही. ही केवळ अफवा आहे. तिने कोणतेही नियम मोडलेले नाहीत.
तसेच निर्मात्यांनी तिला कोणताही इशारा दिला नाही. ती अजूनही कार्यरत आहे. तारक मेहताच्या शोमध्ये काम करणार आहे. अभिनेत्रीला कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.. असं देखील तिने सांगितले आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम :
पलक सिधवानी म्हणाली की, अशा खोटेपणाचा आणि अप्रामाणिकपणाचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ही सगळी बातमी वाचून तिला धक्काच बसला. तर सध्या शोमध्ये गणपतीचा सीक्वेन्स सुरू आहे. हा गैरसमज होऊ नये, अशी ती सर्वांना विनंती करू इच्छिते.





