Sharad Pawar : सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया इशारा देत म्हणाले…
Sharad Pawar : वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar’s first reaction after Sonam Wangchuk was admitted to the hospital : गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २१ वा दिवस होता. मात्र, आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलीस आंदोलन स्थळी दाखल झाले आणि त्यांनी वांगचुक यांना आंदोलनस्थळी हटवून रुग्णालयात दाखल केलं. अचानक पोलिस दाखल झाल्याने आंदोलन स्थळी मोठा गोंधळ उडाला. कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. (Sharad Pawar)
कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद सर्वच स्तरात उमटताना दिसत आहेत. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलन सुरुच राहणार असल्याची मोठी घोषणा कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar)
केंद्र सरकारची बघ्याची भूमिका : शरद पवार
“पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. का तर त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्यांच्या परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिले.” अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. (Sharad Pawar)
पुढे शरद पवार म्हणाले “काँग्रेसच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी गेले. राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात आलं, त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अटकसत्र झालं. बघुयात. सोनम वांगचूक यांना अटक जरी झाली, तरी आंदोलन सुरू राहणार. मागणी रास्त होती. विद्यार्थ्यांसाठी होती.
ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ : अभिजीत दिपके (Sharad Pawar)
अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन ताब्यात घेतलं असा आरोप सोशल माीडियावर पोस्ट करुन केला आहे. यामुळे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ शेअर करत ‘चलो संसद’चा नारा दिला होता. त्यानुसार २० जुलैला हे आंदोलन निघाणार होते. मात्र, ते सध्या रुग्णालयात आहेत. “तुम्ही जंतर-मंतरवर या. इथून आपली चळवळ सुरु राहिलं. ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ” असे आवाहन अभिजीत दिपके यांनी आंदोलनस्थळावरुन केलं आहे. सोनम वांगचूक यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातून आणि बॉलिवूडमधून पाठिंबा वाढत चालला होता. (Sharad Pawar)
Pune District : शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार





