Sonam Wangchuk Video: “मी 20 जुलैपर्यंत जिवंत आहे, त्यानंतर मी…” ; सोनम वांगचुक यांचा नवीन व्हिडिओ समोर
Sonam Wangchuk Video: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस खासदार पवन खेरा यांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे वांगचुक यांची भेट घेतली.

Sonam Wangchuk Video: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस खासदार पवन खेरा यांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे वांगचुक यांची भेट घेतली.
यापूर्वीच अनेक नेत्यांनी जंतर मंतरला भेट दिली आहे. दरम्यान, वांगचुक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले, “मी २० जुलैपर्यंत जिवंत राहीन.” वांगचुक यांनी हे विधान विनोदी सुरात केले आहे.
संसदेवरील मोर्चाचा संदर्भ देत सोनम वांगचुक म्हणाले, “मी २० जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहीन, जेणेकरून मी तुम्हा सर्वांसोबत संसदेवर मोर्चा काढू शकेन. जर २० जुलैचा आमचा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत म्हणून परत येईन.” (Sonam Wangchuk Video)
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती ? (Sonam Wangchuk Video)
वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत आणि परिणामी त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे. शुक्रवारी डॉ. सतीश लांबा म्हणाले, “आज उपोषणाचा २० वा दिवस आहे.” त्यांचे वजन ५६.५५ किलोग्रॅम असून, गेल्या २४ तासांत ३५० ग्रॅमने घट झाली आहे. (Sonam Wangchuk Video)
मैं किसी भी हालत में 20 July तक ज़िंदा रहूँगा ताकि मैं आप सब के साथ संसद तक मार्च कर सकूँ। और अगर 20 July को हमारा मार्च सफल नहीं रहा तो फिर मैं भूत बन कर वापस आऊँगा!”
सोनम वांगचुक ने अपनी ज़िन्दगी के इतने कठिन समय पर भी अपना सेंस ऑफ़ ह्यूमर नहीं खोया!
चलो संसद! pic.twitter.com/qF8oRizKjo
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 17, 2026
त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सामान्य आहे, मात्र सौम्य निर्जलीकरण दिसून आले आहे. डॉक्टरांचे एक पथक वांगचुक यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांना अवयव निकामी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Sonam Wangchuk Video)
सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पक्षाचे सदस्य पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह इतर अनेक पक्षांनी वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे. (Sonam Wangchuk Video)





