Sonam Wangchuk Hunger Strike: AAP अन् SP नंतर सोनम वांगचुक यांना काँग्रेसचा पाठिंबा ; पवन खेरा यांनी जंतरमंतर गाठून घेतली भेट
Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा शुक्रवारी वांगचुक यांना भेटण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले.

Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा शुक्रवारी वांगचुक यांना भेटण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले.
यापूर्वीच के.सी. वेणुगोपाल यांनी वांगचुक यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वांगचुक आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ करत आहेत.
पवन खेरा जंतर मंतरवर पोहोचण्यापूर्वी, काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले होते की, केंद्र सरकारमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव आहे, त्यामुळेच संपूर्ण परीक्षा व्यवस्था कोलमडली आहे. के.सी. वेणुगोपाल यांनीही यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
डिंपल अन् केजरीवाल यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट Sonam Wangchuk Hunger Strike:
काँग्रेसच्या आधी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि शिवसेनेचे नेते जंतर मंतरवर पोहोचले होते. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल स्वतः जंतर मंतरवर पोहोचले होते. त्यांनी वांगचुक यांना देशाचे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली.
सपाच्या खासदार डिंपल यादव आणि रुची वीरा यादेखील त्यांच्यासोबत जंतर मंतरवर पोहोचल्या. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही सोनम वांगचुक यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांचाही वांगचुक यांना पाठिंबा Sonam Wangchuk Hunger Strike:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनीही वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील आंदोलनाचा अधिकारच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिसते.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे की, केवळ नीट परीक्षेतच नव्हे तर सर्वच परीक्षांमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे आणि पंतप्रधान मोदींना या मुद्द्यावर लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान , सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर आहेत, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. खटल्याची सुनावणी करताना, न्यायालयाने सरकारला वांगचुकच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.






