पहिल्या दिवशी कोण ठरलं वरचढ? थामा की एक दीवाने की दीवानियत? पाहा बॅाक्स अॅाफिस कलेक्शन….

Thamma, Ek Deewane Ki Deewaniyat : दिवाळीच्या मुहूर्तावर बॅाक्स अॅाफिसवर बॅालिवूडच्या दोन सिनेमांची क्लॅश झाली आहे. आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा थामा, हर्षवर्धन राणे यांचा एक दिवाने की दिवानियत अशी या सिनेमांची नावे आहेत. काल २१ अॅाक्टोबर रोजी २०२५ हे दोन सिनेमे देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या दिवशी कोणत्या सिनेमाने बाजी मारली हे पाहूयात…
मॅडॉकचा हॉरर कॉमेडी युनिव्हर्स “थामा” सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा अभिनेता आयुष्मान खुरानाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ओपनिंग देणारा सिनेमा ठरला आहे. त्याच्यासोबत प्रदर्शित झालेल्या कमी बजेटच्या “एक दिवाने की दिवानियात” या सिनेमानेही बॅाक्स अॅाफिसवर चांगली कामगिरी केली आहे. दोन नवीन सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी, “कांतारा २” ची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित “थामा” सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई सिनेमाने केली आहे. या सिनेमाचे बजेट अंदाजे १५० कोटी आहे. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय या सिनेमात परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही विशेष भूमिका आहेत.
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा स्टारर एक दिवाने की दिवानीयतही दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या दिवशी, मंगळवारी, ,सिनेमाने ८.५ कोटींची कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिनेमाचे बजेट ३० कोटी आहे. सिनेमाला चांगले ओपनिंग मिळाले आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार ?





