Sonam Bajwa :पंजाबी इंडस्ट्रीतील आपली ओळख निर्माण केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सोनव बाजवाने आपला मोर्चा आता बॅालिवूड इंडस्ट्रीकडे वळवला आहे. तिने अनेक बॅालिवूडमधील अनेक चित्रपटात काम करत लोकप्रियता मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. तिच्या सोशल मीडिया वरील पोस्ट चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या असतात. अभिनेत्रीने पंजाबी इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिने अनेक चढ उतार पाहिले आहेत. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे तिचे चाहते कौतुक करत असतात. अभिनेत्रीने गुरुवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला. फोटो साधेपणाने भरलेला होता, जो चाहत्यांना खूप आवडला. पोस्टमध्ये तिने दिलेले कॅप्शन चाहत्यांना आकर्षित करणारे ठरले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी कधीही असे दिसू इच्छित नाही की माझे आयुष्य पूर्णपणे परिपूर्ण आहे, तर ते नेहमीच असे दिसते की हे सर्व देवाची कृपा आहे आणि त्याने सर्वकाही सांभाळले आहे.” या पोस्टवर चाहते तिचे कौतुक करत आहेत आणि तिचे शब्द प्रेरणा देणारे असल्याचे म्हणत आहेत. ‘बॉर्डर २‘ मध्ये सोनमने साकारलेल्या पात्राचे कौतुक होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत २९५ कोटींपेक्षा जास्त कमाई करून क्रेझ निर्माण केली आहे. Sonam Bajwa सध्या अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) तिच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. हाऊसफुल ५ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सोनमने पदार्पण केले. त्यानंतर ती बागी ४ मध्ये झळकली होती. याशिवाय तिने ‘एक दीवाने की दीवानियात’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. तसेच ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकली आहे. अभिनेत्री सोनम बाजवाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान कायम ठेवले असून, तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. हेही वाचा : Antonio Guterres: “मनमानी करून प्रश्न सुटणार नाही…” ; संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी ट्रम्प अन् शी जिनपिंग यांना फटकारले