सोनाक्षी सिन्हाचा ‘निकिता रॉय’ ठरला फ्लॉप; चार दिवसांची कमाई किती?

Sonakshi Sinha | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ‘निकिता रॉय’ १८ जुलै रोजी रिलीज झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. या चित्रपटाने चार दिवसांत १ कोटींची कमाई करता आलेली नाही.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, निकिता रॉयने पहिल्या दिवशी २२ लाख, दुसऱ्या दिवशी २४ लाख, तिसऱ्या दिवशी ४० लाख आणि चौथ्या दिवशी १० लाख कमावले आहेत. त्यानंतर सिनेमाचे एकूण कलेक्शन ९६ लाख झाले आहे. हा चित्रपट चार दिवसांत १ कोटीही कमावू शकलेला नाही.
या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाबरोबर परेश रावल आणि अर्जुन रामपाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हाने ‘निकिता रॉय’ दिग्दर्शित केला आहे. कुशचा पहिलाच चित्रपट खूप मोठा फ्लॉप ठरला आहे. Sonakshi Sinha |
दुसरीकडे, 18 जुलै रोजीच ‘सैयारा‘ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. सैयारा प्रचंड कमाई करत आहे. अनीत पड्डा आणि अहान पांडे यांच्या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. Sonakshi Sinha |
हेही वाचा :





