Maharashtra Politics : रायगडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; तटकरेंनी जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
Maharashtra Politics : रायगडच्या राजकारणात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

Maharashtra Politics : रायगडच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी आपल्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. (Maharashtra Politics)
सोमनाथ ओझर्डे यांच्या पक्षप्रवेशामुळे महाडच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची महाडमध्ये संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या घडामोडीकडे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी राजकीय आव्हान म्हणूनही पाहिलं जात आहे. (Maharashtra Politics)
तटकरेंची रणनीती काय?
सोमनाथ ओझर्डे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा केवळ पक्षबदल नसून महाडमधील आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याची चर्चा आहे. ओझर्डे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली आहे. (Maharashtra Politics)
सुनील तटकरे यांनी ओझर्डे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर महाडमध्ये आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोमनाथ ओझर्डे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Politics)
महाडमध्ये तटकरेंचा मोठा मेळावा
दरम्यान, सोमनाथ ओझर्डे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी महाडमध्ये भव्य मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. नवरात्रीनंतर महाडमध्ये मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Maharashtra Politics)
त्यामुळे आगामी काळात महाडसह संपूर्ण रायगडच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ओझर्डे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र महाडमध्ये नवं बळ मिळाल्याचं चित्र आहे. (Maharashtra Politics)





