Maharashtra Politics : खारघरमध्ये झेरॉक्सच्या दुकानात सापडल्या एसआयआर फाइल्स; ठाकरेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
Maharashtra Politics : नवी मुंबईतील खारघर परिसरात एका झेरॉक्सच्या दुकानात शुक्रवारी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेशी (SIR) संबंधित हजारो छापील फॉर्म्स आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Maharashtra Politics : नवी मुंबईतील खारघर परिसरात एका झेरॉक्सच्या दुकानात शुक्रवारी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित हजारो छापील फॉर्म्स आढळल्याचा कथित प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्च्याचा एक पदाधिकारी या दुकानात एसआयआर फॉर्म्स झेरॉक्स करत असल्याचा आरोप करत शिवसेना (यूबीटी) च्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व गोंधळ निर्माण झाला. (Maharashtra Politics)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कथित भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले. तसेच परिसरातून हजारो छापील फॉर्म्स जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. (Maharashtra Politics)
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या भाजप युवा नेत्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
नवी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आतापर्यंत कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. (Maharashtra Politics)





